व्हाईट हाऊसवर विमानाच्या घिरट्या

0
549

– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा

न्युर्याक, दि. ५ (पीसीबी) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा झाल्याची बातमी समोर येत आहे. एक विमान अचानक नो-फ्लाय झोनमध्ये घुसल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. हे पाहताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नीला तातडीने सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले.

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने डेलावेअरच्या रेहोबोथ बीच येथील घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांची पत्नी सुरक्षित आहेत आणि कोणताही हल्ला झाला नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली.

अधिकाऱ्याने सांगितलं की, जो बायडेन आणि त्यांची पत्नी जील बायडेन काही काळाने त्यांच्या निवासस्थानी परतले. राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षणासाठी गुप्तहेर संघटनेने विमान चुकून सुरक्षित क्षेत्रात घुसल्याची माहिती गुप्तहेर संघटनेने दिली. सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लीएल्मी यांनी यासंदर्भात माहिती दिली. पायलट योग्य रेडिओ चॅनेलवर नव्हता आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नसल्याचं समोर आलंय.

व्हाईट हाऊस आणि सीक्रेट सर्व्हिसने सांगितलं की, शनिवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या डेलावेअर या ठिकाणी असलेल्या घराजवळ एक लहान खासगी विमानाने उड्डाण घेतलं. हे घर बायडेन सुट्ट्या घालवण्यासाठी वापरतात. चुकून नो-फ्लाय झोनमध्ये हे विमान घुसलं. मात्र त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या. त्यांनी तत्काळ बायडेन आणि त्यांच्या पत्नीला तात्पुरते सुरक्षित स्थळी पाठवलं. युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस या घटनेबद्दल पायलटची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.