भोसरीतील केमिकल शॉपमध्ये ४१ लाखांचा अपहार

0
2

दि.१७(पीसीबी)-मालकाने दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुकानातील कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपयांच्या मालाचा अपहार केला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते २४ मार्च २०२५ दरम्यान गुडविल केमिकल्स शॉप, गुळवे वस्ती, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात अमित श्रीरामजी दरक (४१, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र हनुमान कासट (आळंदी रोड, दिघी), संदीप ज्ञानदेव सदाशिव (आळंदी रोड, भोसरी) आणि रिक्षा चालक बाबुराव बोराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र कासट हा फिर्यादीच्या दुकानात नोकरीस होता. त्याने संदीप सदाशिव आणि बाबुराव बोराडे यांच्याशी संगनमत करून दुकानातील लिक्विड आणि पावडर केमिकल मालकाची परवानगी न घेता परस्पर विकले. या विक्रीतून जमा झालेली ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपये रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांनी मालकाची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.