वाकडमध्ये जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडेच्या मुलावर अॅट्रासिटीचा गुन्हा

0
1251

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – जमिनीच्या वादातून माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांचा मुलासह तीने जणांना वाकडमधील २९ वर्षीय तरूणाला मारहाण केली. या प्रकरणी माजी नगरसेवकाचा मुलगा शंतनू नांदगुडेसह त्यांच्या तीन साथीदारांविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंतनू उर्फ नाना विलास नांदगुडे (रा. पिंपळेनिळख) यांच्यासह त्याच्या तीन साथीदाराविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २९ वर्षीय तरूणाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारा, फिर्यादी आणि शंतनू यांच्यामध्ये जमिनीवरून वाद सुरू आहे. याच वादातून ४ ऑक्टोंबर रोजी फिर्यादी तरूणाला शंतनू आणि त्याच्या इतर साथीदारांनी लोखंडी रॉड आणि लाथा-बुक्यांनी जबर मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी तरूणाच्या कु़टूंबीयाला जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.