ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत महत्वाचा निकाल

0
49

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाने आज ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये ईव्हीएमचाच वापर होईल, पुन्हा मतपत्रिका येणार नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील पावत्यांची शंभर टक्के पडताळणी करण्याच्या सर्व याचिकाही कोर्टाने फेटाळून लावल्या आहेत.
सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारी सर्व याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना झटका दिला आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरू असताना सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या महत्वपुर्ण निकालात स्पष्ट केले आहे की, मतदान ईव्हीएम मशीनवरच होईल. ईव्हीएममधील मतं आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची शंभर टक्के पडताळणी होणार नाही. पुर्वी ज्यापध्दतीने मतमोजणी होत होती, तीच पध्दत पुढेही कायम राहील.

कोर्टाने निकाल देताना निवडणूक आयोगाला दोन महत्वाचे आदेशही दिले आहेत. व्हीव्हीपॅटमधील पावत्या ४५ दिवसांपर्यंत जतन करून ठेवण्याच्या आदेश देण्यात आले आहेत. तसेच सिंबल लोडिंग यूनिटही मतदानानंतर सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उमेदवारांना काही आक्षेप असल्यास मतमोजणीनंतर सात दिवसांच्या आत उमेदवार पुन्हा पडताळणीची मागणी करू शकतात. मात्र, या सगळ्याचा खर्च उमेदवाराला करावा लागणार आहे. त्यामध्ये तथ्य आढळल्यास उमेदवाराला पैसे परत केले जातील, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.