पिंपरी-चिंचवड भाजपच्या महिला शहर उपाध्यक्षांचा भाजप पदाधिकाऱ्यानेच केला विनयभंग; भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  

0
3733

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या ४० वर्षीय शहर उपाध्यक्षांचा विनयभंग झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडीतेने भोर भाजपचे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या महिला पदाधिकाऱ्याच्या मोबाईलवर देशमाने याने अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एका सामाजीक कार्यक्रमा दरम्यान त्यांची आणि भोर भाजपचे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने यांची ओळख झाली होती. यावेळी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर देखील घेतले आणि व्हॉट्सअॅपवर बोलत देखील होते. मात्र महिलेने देशमाने यांना मेसेज करण्यास मनाई केली होती तरी सुध्दा ते महिलेला मेसेज करत होते. रविवारी (दि.२८) रात्री देशमाने यांनी पुन्हा महिलेला अश्लिल व्हिडीओ पाठवून विनयभंग केला. याप्रकरणी पीडित ४० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदुरक अधिक तपास करत आहेत.