दिवाळी विशेष; टेक्निकल दिवाळी फिल्म रिलीज

0
593

पुणे, दि. २९ (पीसीबी) – क्रिएटिव्ह कीडा प्रॉडक्शनच्या वतीने टेक्निकल दिवाळी ही फिल्म प्रदर्शित करण्यात आली.सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आपण सर्व सण साजरे करतो. परंतु यात आपल्या सोबतीला आपली माणसे किती आणि ही टेक्निकल गॅजेट्स किती हे नक्कीच पडताळून पाहायला हवे. आपला पूर्णतः वेळ हा नक्कीच आपल्यासाठी नसतो, तसेच आपले पूर्णतः ध्यान नक्कीच किमान स्वतःसाठी तरी असायला हवे. आपण या टेक्नॉलॉजीच्या जगात स्वतःला विसरत चाललो आहोत हे तितकेच खरे आहे. आजच्या घडीला हे टेक्नॉलॉजीचे कठीण जाळे विणनारा कोळी तर आपणच आहोत. परंतु त्यात आपणच सावज म्हणून अडकून पडलोय किमान याचा शोध नक्कीच घ्यायला हवा. म्हणून दिवाळी विशेषमध्ये ही छोटीशी ३ मिनिटांची फिल्म तयार करण्यात आली आहे.

या फिल्मचे लेखक व दिग्दर्शक प्रल्हाद जाधव आहेत. छायाचित्रण पीटर इंगळे यांनी केले आहे. संकलक विशाल शिवनखेडकर आहे. सहाय्यक दिग्दर्शक तुषार वाशिलकर, मेकअपमन कोमल वाघमारे आहेत. प्रोडक्शन मॅनेजर मनु निळे, तांत्रिक साहाय्य प्रकाश सदाफुले, कपिल कोंडाळवाडे, स्वप्निल कांगणे यांनी केले आहे. या फिल्मसाठी डॉ. राजेंद्र खेडेकर यांनि विशेष सहाय्य केले. या फिल्मध्ये श्रीश खेडेकर, निहार सप्रे, अनुजा कांगणे, तुळसा वाशिलकर यांनी अभिनय केला आहे.