चंद्रकांतदादा- खासदार उद्यनराजेंचा एकाच गाडीतून प्रवास; भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर  

0
1076

सातारा, दि. २९ (पीसीबी) – साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे कुणालाही भीत नाहीत. ते सर्वांना खिशात घेऊन फिरतात, असे राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सातारा येथे उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते.   

त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि उदयनराजे  यांनी एकाच गाडीतून कराड पासून सातारापर्यंत प्रवास केला. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर साताऱ्यात सुरू होती. दरम्यान,   उदयनराजे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्यानंतर भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पाटील यांनी आज (सोमवार) खासदार उदयनराजे यांची शासकीय विश्रामगृहावर सकाळी भेट घेवून चर्चा केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभा उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये धुसफुस सुरू आहे. आमदार गट व खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे उदयनराजे यांची भाजप नेत्यांशी वाढत चाललेली ऊठबस यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना जोर चढत असल्याचे दिसून येत आहे.