पिंपरी चिंचवड चे आमदार TDR च्या मुद्द्यावर गप्प का ? : आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे यांचा सवाल

0
227

टीडीआर प्रकरणी SIT स्थापन करण्याची मागणी

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील अडिच हजार कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळा प्रकऱणावर शहरातील सर्व आमदार गप्प का असा रोखठोक सवाल आम आदमी पार्टीने विचारला आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आपचे शहराध्यक्ष चेतन बेंन्द्रे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. घोटाळ्यातील महत्वाच्या मुद्यांवर आप ने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

महापालिकेची अनेक ठिकाणी अशाच पध्दतीने समावेशक आरक्षणाखाली म्हणजेच एकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत बांधकामे सुरु आहेत. सर्व प्रकरणांत मोबदला देताना २६,६२० रुपये प्रति चौरस मीटर दरानुसार देणे बंधनकारक असताना नियमांचा विपर्यास करून या आरक्षणाबाबत ६५,०६९ रुपये प्रति चौरस मीटर दर का काढण्यात आला ? 
मोबदला देताना शासकिय रेडी रेडीकनरनुसार बांधकामाचा दर २६,६२० रुपये प्रति चौरस मीटर असताना तो ६५,०६९ रुपये प्रति चौरस मीटर का दाखवला ? शहरातील विविध विषयांवर चारही आमदार विधी मंडळात चर्चा करतायेत मग टी. डी. आर विषयावर गप्प का? आजच्या बाजारमुल्यानुसार जादाच्या टीडीआरची किमंत होते तब्बल १५११ कोटी रुपये त्या मध्ये तब्बल ६००० मोहल्ला क्लिनिक तयार झाले असते किंवा ४-५ मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झाले असते, असे बेंन्द्रे यांनी म्हटले.
मोदीजींना आमचा प्रश्न ,तोडून मोडून हे सरकार आपण स्थापन केले, स्थानिक स्वराज्य निवणूका विनाकारण पुढे ढकलताय, कश्या साठी ? आयुक्त तथा प्रशासक मार्फत लोकांच्या पैश्याचे collection करण्या साठी ? आयुक्त शेखर सिंह भाजपाचे collection agent आहेत का ?
आम आदमी पार्टी च्या वतीने सदर विषय प्रकरणी मुख्यमंत्र्यांना मागण्या करत आहोत. त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कॅग (CAG) मार्फत चौकशी करण्यात यावी (मुंबई मनपा च्या धर्तीवर). मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी नगर विकास खात्याचे देखील मंत्री असल्यामुळे व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार जी जिल्ह्याचे पालक मंत्री असल्यामुळे यांनी अजून देखील हिवाळी अधिवेशनामध्ये एवढ्या मोठ्या घोटाळ्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही त्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद आहे. लवकरात लवकर त्यांनी हिवाळी अधिवेशन दरम्यान त्याचे स्पष्टीकरण देऊन सनदी अधिकाऱ्यांची (SIT) टीम बनवून सदर प्रकरणाची चौकशी करावी.
 
आयुक्तांना निलंबित करा –
आयुक्त श्री. शेखर सिंह तसेच नगररचना व विकास, बांधकाम परवाना, स्थापत्य च्या सर्व अधिकाऱ्यांनी SIT मार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे.  २०१७ साला नंतर मनपा हद्दीतील सर्व टी. डी. आर प्रकरणांची (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी ? भूखंड मालक मे. विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लि. यांना दिलेला टी.डी.आर रद्द करण्यात यावा.