पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत विविध विकासकामांना मंजुरी

0
5

पिंपरी, दि. २९ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली.

यावेळी स्थायी समिती सदस्यांसह तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेमध्ये खालीलप्रमाणे विविध विषयांना देण्यात आली मंजुरी :
कचरा संकलन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर व्हीटीएम यंत्रणा बसविणे तसेच त्याची देखभाल व दुरुस्ती करणे या कामास मंजुरी देण्यात आली. जुनी सांगवी परिसरातील रुग्णालयाच्या स्थापत्य दुरुस्ती व अनुषंगिक कामांस मान्यता देण्यात आली. भारत/महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागामार्फत स्वच्छता मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक खर्चास मंजुरी देण्यात आली.

पुणे-बंगळुरू महामार्गाच्या पश्चिमेकडील वाकड, पुनावळे, ताथवडे व इतर भागांमध्ये पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरुस्ती करणे, आवश्यकतेनुसार नवीन लाईन टाकणे व स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. २९ पिंपळेगुरव येथील घाटावर स्थापत्य विषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. २६ कस्पटे वस्ती, वेणूनगर, कावेरीनगर व इतर परिसरांमध्ये फुटपाथ, पेव्हिंग ब्लॉकची देखभाल व दुरुस्ती तसेच स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

प्रभाग क्र. २३ थेरगाव गावठाण येथील पडवळनगर व इतर परिसरांमध्ये पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती व स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. २१ पिंपरी परिसरातील खचलेले ब्लॉक दुरुस्त करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. २१ मधील फुटपाथ, पावसाळी गटर व इतर स्थापत्य विषयक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. १ मधील औद्योगिक परिसरातील रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सन २०२५-२६ साठी ताथवडे व पुनावळे परिसरात आवश्यक ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकणे, वॉल्व बसविणे तसेच अनुषंगिक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. मौजे ताथवडे जीवननगर येथील पाण्याच्या टाकीवरून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यास मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या ताळेबंदपत्रकाचे लेखापरीक्षण करण्यासाठी सनदी लेखापाल नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली. क व ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत गांधीनगर, बालाजीनगर, संजय गांधीनगर व इतर झोपडपट्टी परिसरांमध्ये गटार करणे, स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे व स्थापत्य विषयक देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील आकुर्डी माध्यमिक विद्यालयातील एमएस-सीआयटी केंद्रासाठी फर्निचर खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सन २०२५-२६ साठी किवळे व रावेत येथील उंच पाण्याच्या टाकीच्या जलक्षेत्रात नव्याने विकसित होणाऱ्या भागांसाठी नवीन जलवाहिनी टाकणे व अनुषंगिक कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

ह प्रभागातील सन २०२३-२४ साठी प्रभाग क्र. ३२ जुनी सांगवी परिसरातील देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. २९ पिंपळेगुरव येथील वैद्यवस्ती, सुदर्शननगर, जवळकरनगर व इतर परिसरांमध्ये जलनिस्सारण नलिका टाकणे व सुधारणा कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. २६ पिंपळेनिलख येथील विशालनगर, कस्पटे वस्ती, वाकड आदी भागांमध्ये जलनिस्सारण नलिका टाकणे व सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र. ३१ नवी सांगवी येथील रामनगर व इतर परिसरांमध्ये जलनिस्सारण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच पिंपरी येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येणाऱ्या खर्चासही स्थायी समितीने मंजुरी दिली.

पिंपरी चिंचवड शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेऊन पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे ही महापालिकेची प्राथमिकता आहे. आजच्या स्थायी समिती सभेत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, जलनिस्सारण, आरोग्य व शिक्षण या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांतील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईनच्या कामांना गती देण्यावर भर देण्यात आला आहे.

  • अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

चौकट –माहे एप्रिल २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्थायी समिती सभेत करण्यात आला सन्मान
स्थायी समिती बैठकीदरम्यान माहे एप्रिल २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये कार्यकारी अभियंता सतिश वाघमारे आणि राजेंद्र मोराणकर यांचा समावेश होता. यावेळी त्यांच्या सेवाकाळातील उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली तसेच पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.