शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे असेल, तर काँग्रेससोबतची युती तोडावी – प्रकाश आंबेडकर

0
1458

पंढरपूर, दि. २१ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी खुली स्पर्धा होणार आहे. ज्या पक्षाचे २० खासदार, त्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचे असेल, तर काँग्रेससोबतची युती तोडावी, असा सल्ला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी दिला आहे.

पंढरपूरात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा सल्ला दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या ४८ जागा आधीच वाटून घेतल्या आहेत. तरी ते आमच्याशी चर्चा करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदासाठी खुली स्पर्धा असेल. अशा वेळी २० खासदार निवडून येणाऱ्या पक्षाचा नेताही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणार आहे. त्यामुळे शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचे, असेल तर त्यांनी काँग्रेससोबत केलेली युती तोडावी.