धक्कादायक: थेरगावातील हॉटेलात महिलेला डांबून केला बलात्कार; आरोपी अटक

0
5178

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) –  महिलेला मुल होत नसल्याने एका इसमाने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन, माझ्यासोबत संबंध ठेवले तर तुला मुल होती असे सांगून हॉटेलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच व्हिडीओ रेकॉर्ड करुन घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितल्यास व्हिडीओ सोशल मिडियावर टाकेन अशी धमकी दिली. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि.१२ नोव्हेंबर) दुपारी साडेबाराच्या ते सायंकाळी साडेसहाच्या सुमारास थेरगाव डांगे चौकातील हॉटेल पायोनियर येथे घडली.

याप्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.२०) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार, किरण कृष्णा भालेकर (वय ४२, सोमनाथनगर, वडगावशेरी) या इसमाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण भालेकर याने पीडित ३० वर्षीय महिलेसोबत सुरुवातीला प्रेमाचे नाटक केले. तसेच महिलेला, तु जर माझ्यासोबत संबंध ठेवले तर तुला मुल होईल असे सांगून सोमवारी (दि.१२ नोव्हेंबर) दुपारी साडेबारच्या सुमारास थेरगाव डांगे चौकातील हॉटेल पायोनियर येथे नेले. तसेच महिलेवर बलात्कार करुन त्याचे चित्रीकरण केले. आणि घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगितल्यास व्हिडीओ सोशल मिडियावर टाकेन अशी धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी किरण याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ए.बी.शेटे तपास करत आहेत.