राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. पौर्णिमा सोनवणे यांचे निधन

0
702

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सौ. पौर्णिमाताई रविंद्र (आप्पा) सोनवणे (वय-44) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा असा परिवार आहे. रुपीनगर-तळवडे प्रभागातून त्या सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. प्रभाग अध्यक्षा पदावर होत्या. त्यांचा अंत्यविधी आज सोमवार रोजी दुपारी 1.00 वाजता निगडी स्मशानभूमी येथे होणार आहे.