भोसरीत विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघा सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल

0
2069

भोसरी, दि. २९ (पीसीबी) – दोघा भावांची माहिती आईला दिल्याच्या रागातून दोघा भावांनी मिळून एका विवाहित महिलेच्या कानशिलात लगावून, अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरीतील एकता कॉलनी नं.२, दत्त मंदिराजवळ घडली.

याप्रकरणी पीडित २३ वर्षीय विवाहित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मयुर लक्ष्मण जाधव आणि त्याचा सख्खा भाऊ महेश लक्ष्मण जाधव या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय महिला, आरोपी मयुर आणि त्याचा भाऊ महेश हे एकाच भागात राहतात. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित महिला या दुकानात काही सामान घेण्यास गेल्या होत्या. सामान घेऊन त्या घरी निघाल्या असता आरोपींची आई पीडित महिलेला रस्त्यात भेटली. त्यांनी पीडितेला मयुरबाबत विचारणा केली. यावर मयुर याने पीडित महिलेजवळ येऊन तिच्या कानशिलात लगावली, तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करुन हात धरुन विनयभंग केला. आरोपींनी महिलेला तुम्ही इथे कसे राहता आणि तुझा नवरा इथ कसा कामधंदा करतो अशी धमकी दिली. तसेच महेश याने महिलेला शिवीगाळ करुन पोलीसात तक्रार दिल्यास तुमच्याकडे पाहुन घेतो अशी धमकी दिली. याप्रकरणी मयुर आणि महेश या दोघा सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.वाय.पाटील तपास करत आहेत.