पत्रकार परिषद घेऊन तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार आहे – नाना पाटेकर

0
800

मुंबई, दि.२९ (पीसीबी) – अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांसाठी बॉलिवूड कलाकारांचा पाठिंबा मिळू लागला आहे. तर नाना पाटेकर यांनीही तनुश्रीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रीकरण आटोपल्यानंतर लवकरच मुंबईत रितसर पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचे नाना पाटेकर यांनी सांगितले आहे. नाना पाटेकर सध्या जसलमेर येथे एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत.

‘मी सध्या जसलमेरमध्ये चित्रीकरणासाठी आलो आहे. मुंबईत परतल्यानंतर सात किंवा आठ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार आहे. तुम्ही मला कोणतेही प्रश्न विचारु शकता. मला कोणतीच गोष्ट लपवण्याची गरज नाही’,असे नाना एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले.