पिंपरी-चिंचवड शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या; सी. आर. सामाजिक संघटनेची मागणी

0
794

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचे छत्रपती शिवाजी महाराज शहर असे नामांतर करावे, अशी मागणी सी. आर. सामाजिक संघटनेने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात संघटनेचे शहराध्यक्ष संदिप खुंटे यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. शहरापासून जवळ असलेल्या ग्रामीण भागात अनेक शिवकाली गडकोट किल्ले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

यावेळी संघटनेचे शहर उपाध्यक्ष दत्तात्रय रणदिवे, सुशील शेलार, संतोष उथळे आदी उपस्थित होते.