प्रियांका चोप्रा-निक जोनास विवाहबंधनात

0
457

जयपूर, दि. १ (पीसीबी) – ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास अखेर आज (शनिवारी)  विवाहबंधनात अडकले. त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले असून २ डिसेंबर रोजी पारंपारिक हिंदू पद्धतीने लग्न करणार आहेत. जोधपुरमधील आलिशान उमेद भवनमध्ये निक आणि प्रियांकाचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी निक आणि प्रियांकाचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित होते.  

दीपिका -रणवीर यांच्या लग्नानंतर चाहत्यांना प्रियांकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. त्यामुळे  कलाविश्वातील सर्वांची या लग्नाकडे डोळे लागले होते. अगदी मोजक्या आणि ठराविक पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या विवाहसोहळ्यामध्ये सर्व काही विशेष होते. अगदी जेवणापासून ते या जोडीच्या कपड्यांपर्यंत सारखे काही खास होते.

दरम्यान, आज रात्री ९  ते ११ वाजेपर्यंत गायक मानसी स्कॉटच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. लग्नासाठी १००  पाहुणे उपस्थित होते. या पाहुण्यांसाठी उमेद या शाही हॉटेलचे सर्व रुम्स बुक केले आहेत. तर प्रियांका आणि निकसाठी महाराजा आणि महाराणी स्विट्स बुक करण्यात आले आहे.