पार्थला सल्ला देणार नाही, ठेच लागल्यावर शहाणा होईल – शरद पवार

0
984

बारामती, दि. २३ (पीसीबी) – पार्थला सल्ला देणार नाही, ठेच लागल्यावर तो आपोआप शहाणा होईल,  असे सूचक विधान  राष्ट्रवादीचे  अध्यक्ष  शरद पवार यांनी केले आहे. कार्यकर्ते ठेचा लागूनच तयार होत असतात. त्यांना सल्ला देण्याची गरज नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.   

पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थच्या प्रचारासाठी शरद पवारांनी मावळमध्ये सभा घेतली होती. या सभेला अजित पवारही  उपस्थित  होते.  मात्र, या सभेत पार्थ पवारला भाषण करता आले नाही, त्यामुळे पार्थची सोशल मीडियावर खिल्ली उडविण्यात आली. यावर पत्रकारांनी शरद पवारांना पार्थला सल्ला देणार का? असा सवाल केला असता पवारांनी सल्ला देणार नसल्याचे उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले की, मुलांना सल्ला द्यायचा नसतो, ठेच लागली की ते शिकतात आणि शहाणे होतात, असे सूचक विधान पवारांनी  केले. तर माझे हे पहिलेच भाषण होते, मात्र भाषण करणार नाही, तर काम करणार असा विश्वास पार्थ पवार यांनी व्यक्त केला आहे.