बारामतीत सुप्रिया सुळेंच्याविरोधात कांचन कुल यांचे आव्हान   

0
952

पुणे, दि. २३ (पीसीबी) – बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजपने सुळेंच्याविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले आहे.

बारामतीतून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. भाजप ही जागा स्वत: लढवणार की महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला देणार याबाबत उत्सुकता  लागली होती. अखेर भाजपने राष्ट्रीय समाज पार्टीचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.

सुप्रिया सुळे यांचा थेट सामना कांचन कुल यांच्याशी होणार आहे.  २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी   सुळेंच्याविरोधात चांगली लढत दिली होती. या निवडणुकीत सुळेंचा विजय झाला, तरी त्यांचे मताधिक्य कमालीचे कमी झाले होते. आता कुल सुळेच्या समोर आव्हान उभे करणार का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.