भाजपची दुसरी यादी जाहीर; महाराष्ट्रातील विद्यमान चार खासदारांची तिकीटे कापली  

0
722

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची  दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापली आहेत.  पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापून पालकमंत्री गिरिश बापट यांना  उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांना डावलून जयसिद्धेश्वर स्वामी यांना  तिकीट देण्यात आले आहे. त्याचबरोबर जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचेही तिकीट कापण्यात आलेले आहे. 

जळगावमध्ये  माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याऐवजी गिरीश महाजन यांच्या गटाच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तसेच बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार  सुप्रिया सुळे यांच्या विरोधात दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट देण्यात आलेली आहे. तर दिंडोरीमधून चव्हाणांच्या जागी डॉ. भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी  नुकताच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत  भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपचे दुसऱ्या यादीतील उमेदवार –

पुणे – गिरीश बापट

दिंडोरी – डॉ. भारती पवार

जळगाव – स्मिता वाघ

सोलापूर- जयसिद्धेश्वर स्वामी

बारामती – कांचन कुल