खालापूर प्रचार दौऱ्यात खासदार बारणे यांचे जंगी स्वागत

0
46
  • खासदार बारणे यांचा खालापूर परिसरात झंझावाती प्रचार दौरा
  • खालापूरच्या ग्रामीण भागात बारणे यांनी साधला मतदारांशी संवाद
  • महडच्या श्री वरद विनायकाचे व धाकटी पंढरीच्या विठोबाचे घेतले बारणे यांनी आशीर्वाद

खोपोली – कर्जत- खालापूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे 20 गावांना भेट देत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज (बुधवारी) मतदारांशी संपर्क साधला. प्रत्येक गावात बारणे यांची उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

खासदार बारणे यांनी रानसई, शिरवली, वावोशी, आपटी, डोणवत, नारंगी, चिलठण, भोकरपाडा, खाणाव, शेमडी, ठाणेनाव्हे, ढेकू, साजगाव, अंजरून, बीड, महड, सावरोली, धामणी, खालापूर आदी गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला. फटाके वाजून, औक्षण करीत, ठीकठिकाणी बारणे यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. बारणे यांनी मतदारांशी संवाद साधत आतापर्यंत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. काही प्रलंबित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासनही बारणे यांनी यावेळी दिले.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महडच्या श्री वरद विनायकाचे दर्शन घेऊन बारणे यांनी पूजा व प्रार्थना केली. त्यावेळी मंदिरात उपस्थित भाविकांनीही बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. साजगाव मंदिर धाकटी पंढरी येथील बोंबल्या विठोबाचे खासदार बारणे यांनी दर्शन घेतले. खालापूर नगर पंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून बारणे यांनी त्यांना अभिवादन केले.

बारणे यांच्या समवेत शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, जिल्हाप्रमुख संतोष भोईर, संघटक संतोष विचारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर विधानसभा प्रमुख किरण ठाकरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख संदेश पाटील, आरपीआय तालुका अध्यक्ष महेंद्र धनगावकर, रासपचे कोकण विभाग प्रमुख भगवान ढेपे, खालापूर तालुकाध्यक्ष आनंद ढेपे, पनवेल तालुकाध्यक्ष मुकेश भगत, महिला तालुकाध्यक्ष मनीषा ठाकूर, शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष रेश्मा आंग्रे, राष्ट्रवादीचे एच. आर. पाटील, युवा सेना तालुकाप्रमुख रोहित विचारे, शिवसेना तालुका समन्वयक आप्पा फावडे, शिव उद्योग तालुकाप्रमुख शशिकांत मोरे तसेच अविनाश कांबळे, हेमंत माने, शशी विचारही उत्तम परबलकर, सागर पाटील, रवी पाटील हेमंत नांदे, मुनीर धनसे, हेमंत पाटील, इलियास धनसे, वसीम धनसे, पांडुरंग बर्गे, दगडू बर्गे आदी पदाधिकारी दौऱ्यात सहभागी झाले होते.