दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकरांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी; अबू सालेमच्या टोळीतील एकाने धमकी दिल्याचा संशय

0
288

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचे प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आल्याचं समोर येतंय. या संदर्भात महेश मांजरेकर यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीला नवंख नाही. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉंटेड, या सारख्या अनेक चित्रपटांच त्यांनी दिग्दर्शन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. शिवाय त्यांनी अभिनयाचा देखील वेगळा ठसा उमटवला. महेश मांजरेकरांना बुधवारी खंडणीसाठी धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही तातडीने आपली सूत्र हलवत खंडणीची मागणी करणाऱ्याला अटक केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, खंडणीची मागणी करणारा खेडमधील असल्याचं कळतंय. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का? त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, या सर्व बाबी पोलीस तपासात समोर येणार आहे.