विरोधी पक्षनेते नाना काटे कोरोना पॉझिटिव्ह

0
446

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – सतत नागरिकांशी संपर्क आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने फिरतीचा परिणाम अनेक लोकप्रतिनिधींवर झालेला दिसतो आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे १३ नगरसेवक आजवर कोरोना बधित झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

नाना काटे म्हणाले, कोरोनाच्या निमित्ताने अडचणीत आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेले चार महिने आम्ही सतत प्रयत्न करतो आहोत. कोरोना होऊ नये यासाठी मास्क, सोशल डिस्टंन्स असे सर्व उपाय करतो, पुरेपूर काळजी घेत आलो. गल्या चार-सहा दिवसांपासून मला घशात खवखवत होते म्हणून तपासणी केली असता कोरोना पॉझिटिव्ह सांगितले. आज रिपोर्ट हातात पडताच पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो. तब्बेत ठिक आहे.

दरम्यान, नाना काटे यांच्या हस्ते आजच चगताप डेअरी चौकातील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे यांच्यासह अनेक नगरसेवक अधिकारी उपस्थित होते. बुधवारी (२६ ऑगस्ट) महापालिका सर्वसाधारण सभेला काटे हे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात आजी-माजी नगरसेवकांना कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणावर झाली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि जावेद शेख यांचा त्यात मृत्यू झाला. बाकी सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.