डॉ. देखणे कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ भाऊसाहेब भोईर यांचे मत

0
143

पिंपरी दि. २९(पीसीबी): संत साहित्याचे अभ्यासक, कवी, लेखक, विचारवंत यापेक्षा ते मार्गदर्शक आणि कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ होते. त्यांच्या संवादातून जगण्याचा आॅक्सिजन मिळत असे. जसं आहे तस बोलावे, ही वक्तृत्वाची ताकद त्यांनी दिली. ताल, तोल लय याच भान असणारे व्यक्ती होय.

शहराला सांस्कृतिकनगरी म्हणून लौकीक मिळवून देण्यात योगदान मोलाचे आहे, असे मत चिंचवड श्री भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. त्यावेळी प्रभुणे बोलत होते. महाराष्टÑ साहित्य परिषदेचे कार्यवाह उद्धव कानडे, पिंपरी-चिंचवड नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मसाप पिंपरी-चिंचवड अध्यक्ष राजन लाखे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे अध्यक्ष पुरूषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी, कवयित्री सुरेखा कटारिया, राजू गोलांडे, शाहिरी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश ढवळे, कवी सुरेश कंक, साहित्यिक श्रीकांत चौगुले, राजेंद्र घावटे, नाना शिवले, विनायक रणसुभे, मोरेश्वर शेडगे, राज अहिरराव, काशिनाथ नखाते, वर्षा बालगोपाल, सुहास घुमरे, कैलास बहिरट, रमेश पाचंगे, संगीता झिंजुरके, मानसी चिटणीस, सुप्रिया सोळंकुरे, नितीन हिरवे, योगेश महाजन, बाजीराव सातपुते, अशोकमहाराज गोरे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

पद्श्री गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘‘संत साहित्य आणि लोककलाक्षेत्रात डॉ. रामचंद्र देखणे यांचे बहुमोल असे योगदान होते. लोककलेतील भूमिकांचा इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच या भूमिकाही ते जगले. शहरातील सांस्कृतिक चळवळ वाढीस लावण्याचे काम त्यांनी केले. सामान्यमधील असामान्य होते. माणूसपण जपणारे व्यक्ती होते, अत्यंत समाधानी आणि कलासक्त आयुष्य जगणारा अभ्यासू आणि चिंतनशील साहित्यिक होते. लोककला आणि संत साहित्यांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.’’
कानडे म्हणाले, डॉ. देखणे पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक वैभव होते. प्रकाशाचे बोट दाखविणारे आणि संतांचा मानवता धर्म जपणारे व्यक्तीमत्व होते. त्यांच्या साहित्यातील ज्ञानप्रकाश आपल्याला सदैव वाट दाखविल.’’

भाऊसाहेब भोईर म्हणाले, ‘‘संत साहित्याचे अभ्यासक, कवी, लेखक, विचारवंत यापेक्षा ते मार्गदर्शक आणि कलाप्रेमींना दिशा दाखविणारा दीपस्तंभ होते. त्यांच्या संवादातून जगण्याचा आॅक्सिजन मिळत असे. जसं आहे तस बोलावे, ही वक्तृत्वाची ताकद त्यांनी दिली. ताल, तोल लय याच भान असणारे व्यक्ती होय. शहराला सांस्कृतिकनगरी म्हणून लौकीक मिळवून देण्यात योगदान मोलाचे आहे. ’’ त्यांच्या जाण्याने माझी व्ययक्तीत हानी झाली आहे.

स्मारक करावे
पिंपरी-चिंचवड च्या सांस्कृतिक उभारणीत डॉ. देखणे यांचे योगदान मोलाचे आहे. त्याचे साहित्यरूपी स्मारक पिंपरी-चिंचवड शहरात करावे, तसेच साहित्याचे दालन करावे, अशा सूचना यावेळी मान्यवरांनी केल्या. तसेच विविध मान्यवरांनी डॉ. देखणे यांच्या आठवणी सांगितल्या.