चाकण, आळंदी, तळेगाव, चिखली मधून दुचाकी, कार चोरीला

0
194

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – वाहन चोरट्यांनी शहरात हैदोस घातला असून वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहन चोरीचे आणखी सात प्रकार उघडकीस आले आहेत. चाकण मधून दोन दुचाकी आणि एक कार तर तळेगाव परिसरातून दोन आचाकण, आळंदी, तळेगाव, चिखली मधून सहा दुचाकी, एक कार चोरीलाणि आळंदी व चिखली मधून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत गुरुवारी (दि. 19) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ओंकार हनुमंत जोशी (वय 24, रा.एकतानगर, ता. खेड) यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली. सुरज पांडुरंग इंगोले (वय 36, रा. चाकण) यांची 60 हजार रुपये किमतीची एक कार अज्ञात चोरट्यांनी मेदनकरवाडी येथील एका पेट्रोल पंपासमोरून चोरून नेली आहे. तसेच संगीत शरद वाडकर (वय 40, रा. महाळुंगे) यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे. वरील तिन्ही प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रमोद पोपट भालेराव (वय 39, रा. आळंदी) यांची 40 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेली. या घटनेचा आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

रांगा हनुमंता स्वामी (वय 38, रा. देहूरोड) यांची 10 हजारांची दुचाकी तर पियुष पोपटराव सोनवणे यांची 20 हजारांची दुचाकी चोरट्यांनी सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल समोरून चोरून नेली आहे. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमीर गनी शेख (वय 45, रा. शाहूनगर, चिंचवड) यांची आठ हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरून नेली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.