अल्पवयीन मुलांची कोयता घेऊन वाहनांची तोडफोड करत राडा

0
441

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – पाच अल्पवयीन मुलांनी एका महिलेसोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून हातात कोयता घेऊन परिसरातील वाहनांची तोडफोड केली. तसेच एका दगड व कोयता मारला. ही घटना गुरुवारी (दि. १९) रात्री अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

संतोष दत्तात्रय भिसे (वय २८, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांचे आणि सुजाता गजरमल यांच्याशी जुन्या भांडणाच्या कारणावरून भांडण सुरु होते. त्यावेळी मुले हातात कोयता घेऊन आली. त्यांनी फिर्यादी यांच्या दुचाकीची तोडफोड केली. तसेच सुरज साहेबराव धावारे यांच्या दुचाकीची तोडफोड करून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर एका दगड व कोयत्याने मारले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.