कॅ. ए. सो. च्या प्रेरणा विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण

0
300

निगडी, दि. २० (पीसीबी) – कॅ.ए.सोसायटीचे प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निगडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅ.ए.सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती होते तर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.एस.सी.बोर्डाचे माजी सहाय्यक सचिव अनिल गुंजाळ उपस्थित होते. तसेच संस्थेचे मानद सचिव बाबुराव जवळेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. दासरी मीनाक्षी व कार्यालयीन प्रशासकीय सल्लागार सौ. इथापे शुभांगी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाच्या वेळी २०२२-२०२३ या वर्षात सहशालेय व विविध क्रीडा स्पर्धेतील गुणवंत व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अनिल गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अभ्यास व व्यक्तिमत्व या विषयी मार्गदर्शन केले. कु.प्रगती गायकवाड इ.१२ वी कला शाखेतील विद्यार्थिनीचा राष्ट्रीय खेळाडू म्हणून विशेष गौरव करण्यात आला.

स्नेहसंमेलनाच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रसंग सादरीकरण करून दाखवले. ही भूमिका श्री. पाटील प्रमोद, तुकारामांची भूमिका श्री. केदारी विशाल यांनी पार पाडली. मावळ्यांची भूमिका विद्यार्थ्यांनी पार पाडली. संस्थेच्या सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्रेरणा समूहातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नृत्य कार्यक्रमाची तयारी १५ दिवस आधी केली. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सौ. बडदाळ मनिषा यांनी केला. बक्षीस वितरण वाचन श्री. किरण थोरात यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री. पाटील प्रमोद श्री संजय कुऱ्हाडे तर नृत्याचे संयोजन श्री.अनिल भांड यांनी केले. आभार प्रदर्शन प्रेरणा पूर्व प्राथमिकच्या सौ. सरिता विधाटे यांनी केले. एकंदरीत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. श्री. वालचंद संचेती यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांचे कौतुक करून अभिनंदन केले.