कारच्या धडकेत जखमी झालेल्या चिखलीतील वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू

0
614

 भोसरी, दि. ९ (पीसीबी) – चारचाकी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या ६० वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.८) मृत्यू झाला.

या प्रकरणी तानाजी आप्पासाहेब मेमाणे (वय २३ रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टाटा नेकसॉन( युपी ५३/ सीयू ०७००) या कार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी मेमाणे यांचे काका शिवचरण जकापुरे (वय ६०) हे चिखलीतील साने चौकातून पायी निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना २० फेब्रुवारी रोजी घडली होती. त्यांच्यावर वायसीएम रूग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी (दि.८) त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास चिखली पोलीस करत आहेत.