खोपोलीजवळ ट्रक आणि कारच्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू

0
911

लोणावळा, दि. ९ (पीसीबी) – मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खोपोलीजवळ  ट्रक आणि आर्टिका कारच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.  पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या आर्टिका कारने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली.  हे दोन्ही अपघात आज (शनिवार) दुपारी सव्वादोनच्या सुमारास झाले.

जखमी झालेल्यापैकी दोन जणांना एमजीएम तर एकाला लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत्यू  झालेल्या तीन जणांचे मृतदेह खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

मुंबईहून आर्टिका कारने तिघेजण पुण्याच्या दिशेने निघाले होते. खालापूर हद्दीतील फुडमॉल येथे  चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार  ट्रकच्या मागच्या बाजूवर जोरात  धडकली.  या अपघातात चालकासह दोघेजण जागीच ठार झाले .

तर याच ठिकाणी दुसऱ्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  अपघातानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तर अपघातस्थळी पोलिसांनी धाव घेत जखमींना  पनवेल येथील एमजीएमला तर एकाला लोकमान्य रुग्णालयात दाखल केले आहे.