ईव्हीएमचा वाद : मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा?

0
462

नवी दिल्ली, दि, ८ (पीसीबी) – गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिला नसल्याने बॅलेटपेपरद्वारेच मतदान झाले पाहिजे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे सांगतानाच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांनी हा दावा केला.

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगासह भाजपवरही टीका केली. ज्या देशात दोन महिने निवडणुका चालतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? असा सवाल राज यांनी केला. गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएमवर लोक संशय घेत आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल, असे सांगतानाच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. या मतदारसंघात जास्तीचे मतदान मोजले गेलंय. याकडेही निवडणूक आयोगाचे लक्ष वेधल्याचे ते म्हणाले.