हिंजवडी आणि ताथवडेत दुचाकी चोरीला

0
378

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – दोन वेगवेगळ्या घटनेत एकूण ४० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाक्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

पहिली घटना हिंजवडी फेज ३ येथील फिल्टर्स या कंपनीसमोर घडली. येथे फिर्यादी गणेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०, रा. कासारसाई ता. मुळशी) यांनी गुरुवार (दि.४) त्यांची २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पलेंडर दुचाकी (क्र.एमएच/१२/एचएम/५२३३) ही लॉक करुन पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्याचे लॉक तोडून ती चोरुन नेली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

तर दुसरी घटना ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेजजवळ घडली. येथे फिर्यादी सुरज अनिल टेकाळे (वय ४५, रा. दुर्गा कॉलनी गल्ली क्र. २, ठवकर यांची खोली वाकड) यांनी मंगळवार (दि.२) त्यांची २० हजार रुपये किमतीची हिरो होंडा पॅशन दुचाकी (क्र.एमएच/१४/यु/१४९१) ही लॉक करुन पार्क केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्याचे लॉक तोडून ती चोरुन नेली. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करत आहेत.