‘चिखल इथेही आहे.. चिखल तिथेही होता…पण तो गजाआड

0
464

मुंबई दि, ८ (पीसीबी) – मुंबई गोवा महामार्गावर खड्डे पडल्याने रस्तावर चिखल उडत असल्या कारणावरुन काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांधकाम उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करून धक्काबुक्की केली होती. असे वागणे चुकीचे असल्याच अनेक नेत्यांनी म्हंटल आहे. याप्रकरणी नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका फोटोतून नितेश राणेंना मार्मिक टोला लगावला आहे.

 

चिखल इथेही आहे.. चिखल तिथेही होतापण तो गजाआड आहेहा मनाआड,’ असं कॅप्शन देत आदित्य ठाकरे यांचा स्वच्छता करतानाचा एक फोटो युवासेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या कॅप्शनद्वारे तुरुंगात असलेल्या नितेश राणे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.