अल्पवयीन मुलीचा पाठलाग आणि विनयभंग ; तरुणा अटक

0
168

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. मुलीच्या आई वडिलांना तरुणाने फोनवर शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल ते १७ एप्रिल या कालावधीत पिंपरी येथे घडली.

राहुल रमेश पार्चा (वय २२, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित १५ वर्षीय मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा आरोपी राहुल याने फिर्यादी यांची इच्छा नसताना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून फोन करून त्रास दिला. फिर्यादी मुलीचा हात धरून त्याच्याशी बोलण्यासाठी मुलीला धमकी दिली. फिर्यादीच्या आई वडिलांना फोन करून त्याला फिर्यादी मुलीसोबत बोलायचे आहे असे म्हटले. त्यासाठी आई वडिलांनी नकार दिला असता त्यांना फोनवर आरोपीने शिवीगाळ व दमदाटी केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.