सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

0
236

चाकण, दि. १९ (पीसीबी) – चाकण येथील एका सोसायटीच्या पार्किंग मधून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली.

सुब्रन्सू शेखर पाटील (वय २३, रा. चाकण) अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची ५० रुपये किमतीची दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रविवारी (दि. १७) रात्री नऊ ते सोमवारी (दि. १८) सकाळी साडेपाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.