महिलेच्या मानलेल्या भावाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
371

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – महिलेने एका तरुणाला भाऊ मानले. त्यामुळे त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणे होत असे. त्याचाच गैरफायदा घेऊन तरुणाने महिलेच्या अल्ववयीन मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर केले. ही घटना मागील पाच ते सहा महिन्यांपासून काळेवाडी येथे घडली.

तेजस सुरेश अहिवळे (वय २५, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे त्याचे महिलेच्या घरी येणे-जाणे होत होते. त्याने फिर्यादी यांच्या १४ वर्षीय मुलीसोबत जवळीक साधून तिच्यावर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. याबाबत घरात कुणाला सांगितले तर मुलीच्या आई वडिलांना मारून टाकण्याची आरोपीने धमकी दिली. अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.