कोरोनावर लस सापडली ‘गुरुवारी होणार लोकांवर चाचणी, ऑक्सफर्डचा दावा

0
686

कोरोनावर लस सापडली ‘गुरुवारी होणार लोकांवर चाचणी, ऑक्सफर्डचा दावा

नवी दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – जगभरात कोरोनाने थैमान घातल आहे. भारतासह तब्बल १८० पेक्षा जास्त देशात या रोगाने हाहाकार माजवलाय. अनेक देश लॉकडाऊन स्थितीत आहेत. त्यामुळे या आजारावर लस कधी निघणार हा सगळ्या जगाला पडलेला प्रश्न आहे. मात्र जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. डेली यु. के. मेल या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार गुरूवारी लोकांवर ती लस टोचली जाणार आहे.

 

 

डेली यु. के. मेल या वेबसाईटने एट ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय, “ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये विकसित होणारी कोरोना व्हायरसच्या लसीची गुरूवारी लोकांवर चाचणी केली जाईल”. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. आपल्या टीमने कोविड १९ म्हणजेच कोरोनावरील लस शोधल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील लसीचे १० लाख डोस उपलब्ध होतील.