‘या’ लोकांना लवकरात लवकर शहराबाहेर हाकला; राजू पाटील यांची मागणी

0
566

 

मुंबई, दि.२२ (पीसीबी) – राज्यातील कोरोना विषाणूचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे. तसेच सर्वाधिक रुग्ण हे मुंबईमध्ये आढळत आहे. तर दुसरीकडे पुण्यात देखील कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच दिल्लीच्या मरकज येथील तबलीगी जमातीतील काही संभाव्य कोरोनाग्रस्तांना डोंबिवलीत आणल्याप्रकरणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.याबाबत पाटील यांनी ट्विट केले आहे. ते म्हणतात, ‘डोंबिवली,पाथर्ली येथे BSUP त काही तबलिगींना ठेवण्यात आले आहे अशी माहिती मिळतेय. आधीच कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या डोंबिवलीत या लोकांची उपस्थितीत जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे ही विनंती’.

पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात ते म्हणतात,’कोरोनाच्या विळख्यातून कल्याण-डोंबिवलीही सुटू शकली नाही. राज्यात कल्याण-डोंबिवलीचा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्यात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागतो. आपल्या इथं रोग पसरण्यासाठी नाममात्र असलेली आरोग्यसेवा आणि काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे