कोरोना लक्षणं जाणून घेण्यासाठी देशात होणार टेलीफोनिक सर्व्हे; ‘या’ क्रमांकावरुन येईल कॉल

0
345

नवी दिल्ली, दि.२२ (पीसीबी) – कोरोना व्हायरसचं संकट देशामध्ये काही थांबत नाही. देशातील अनेक राज्यात कोरोनाचा संसर्ग हा वाढतच चालला आहे. या जीवघेण्या व्हायरसचा संसर्ग होऊन आतापर्यंत जगभरात ०१ लाख ६९ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आळा बसवण्याकरिता केंद्र सरकारच्यावतीने पुन्हा एकदा ठोस पाऊले उचलण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या लक्षणासंबंधित प्रत्येक नागरिकांकडून माहिती घेण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने टेलिफोनिक सर्वेक्षण सुरु करणार आहे. एनआयसीद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी १९२१ या क्रमांकावरुन तुमच्या मोबाईलवर कॉल करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ही १८ हजारवर गेली आहे. आतापर्यंत एकूण १८ हजार ६०१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये ५९० जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ०३ हजार ५५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.