‘हि’ आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी. जिथे आरशावर तरंगतात होड्या….

0
1356

– भारतातील हे ठिकाण नाही तर काय पाहिलंत

मेघालयातील या जागेबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. कि, इथे पाण्यावरती नाव अशी दिसते जस कि खाली आरसा ठेवला आहे जणू…

हि नदी इतकी स्वच्छ आहे कि, नदीचा तळ, त्यातील लहान-मोठे दगड, वाळू, छोटे जीव आपण स्पष्टपणे दुरून सुद्धा पाहू शकतो. जर आपण या नदीमध्ये बोट किंवा नाव घेऊन गेलो तर त्याची सावली सुद्धा अगदी स्वच्छ आणि स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. आणि यासर्व अनुभवांवरूनच आपल्याला या नदीच्या स्वच्छतेचा अंदाज येतो. आणि म्हणूनच या नदीला आशियातील ‘सर्वात स्वच्छ नदी’ म्हणतात. या नदीचं नाव आहे ‘उमनगोत’.

आजच्या काळात प्रत्येक नदीमध्ये प्रदूषणामुळे खूपच जास्त बदल झाले आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रदूषणामुळे पाणी काळ झालं आहे. आपल्याला आता स्वच्छ नदी कुठे पाहायलाच मिळत नाही. पण मेघालय मधील ‘उमनगोत’ नदी प्रदूषणाला अपवाद ठरत आहे. या नदीतील पाणी हे आरश्याहून स्वच्छ आहे. म्हणून मेघालायला ‘सर्वात स्वच्छ नदी असलेलं शहर’ असा नावलौकिक मिळाला आहे. शिलॉंग पासून ८५ किलोमीटर अंतरावर असलेले भारत- बांगलादेश सीमेवरती असलेल्या डोंगराजवळून हि नदी वाहते. जिला ‘डोंगरांमध्ये लपलेला स्वर्ग’ असं सुद्धा संबोधलं जात. इथले आदिवासी त्यांच्या पूर्वजांपासूनच या नदीची रोजची साफसफाई करत आलेले आहेत. ज्यामुळे हि नदी जगप्रसिद्ध झाली आहे.

अशी केली जाते या नदीची साफसफाई
हि नदी ३ गावांमधून वाहते. त्यामुळे या तीनही गावांवरती या नदीच्या साफसफाईची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. त्यामुळे हि नदी रोजच स्वच्छ केली जाते. या गावामध्ये जवळपास ३०० हुन जास्त घर आहेत. जे एकत्र येऊन सफाई करतात. जर कोणी चुकूनही नदी अस्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी हि गाव जागच्याजागी तब्बल ५०००/- रुपयांचा दंड ठोठावतात.

येणाऱ्या पर्यटकांच्या आणि निसर्गप्रेमींच्या संख्येवरून पाहता महिन्यातून ठरवलेल्या १-२ दिवस गावातील प्रत्येक घरातून कमीतकमी १ व्यक्ती नदी स्वच्छ करण्यासाठी येऊन हातभार लावणे येथे बंधनकारक आहे.

सगळ्यात जास्त पर्यटक या दिवसात असतात
वर्षातील नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंत इथे सगळ्यात जास्त पर्यटक येतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथे बोटिंग पूर्णपणे बंद केली जाते. फक्त स्वच्छ नदीसाठीच नाही तर आशियाच ‘सर्वात स्वच्छ गाव’ असा दर्जा या गावाला प्राप्त झाला आहे. स्वछतेसाठी एवढे कडक नियम बनवणाऱ्या या गावाचं नाव आहे ‘मावलिननॉन्ग’.