काही वेळासाठी दरवाजा उघडा राहिला… नंतर पाहिलं तर दोन लॅपटॉप, एक मोबाईल फोन गायब !

0
317

पिंपरी, दि. 30 (पीसीबी) – अज्ञात चोरट्यांनी घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून घरातून दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 28) सकाळी आठ ते नऊ वाजताच्या सुमारास संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

सुरेश दगडू गुंजाळ (वय 23, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याबाबात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुंजाळ यांच्या घराचा दरवाजा सोमवारी सकाळी आठ ते नऊ वाजताच्या कालावधीत उघडा होता. त्या उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून 45 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.