स्वच्छ, सुरक्षित अन्नाची जबाबदारी फेरीवाल्यांची – काशिनाथ नखाते

0
369

– जागतिक अन्नसुरक्षा दिनी केली जनजागृती
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – ज्याप्रमाणे सुरक्षित व स्वच्छ अन्न मिळविण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. तसेच स्वच्छ, सुरक्षित व विना हानिकारक अन्न देणे हे फेरीवाले व सर्व विक्रेत्यांची प्रथम जबाबदारी आहे. अन्नपदार्थपासून निर्माण होणाऱ्या धोक्याकडे लक्ष देऊन ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले .

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज (मंगळवारी) जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणच्या पथ विक्रेत्याकडे अचानक भेट देऊन ते तयार करत असलेल्या अन्नाबाबत चौकशी केली व माहिती घेतली .

कार्याध्यक्ष इरफान चौधरी ,सहदेव होनमाने, रामा बिराजदार, अंबालाल सुखवाल, ओमप्रकाश मोरया, नाना कसबे, मेहबूब शेख ,समाधान मुसळे, प्रहार आंदोलनाचे राजेंद्र वाकचौरे,महेबुब शेख आदी उपस्थित होते

यावेळी नखाते म्हणाले की फळे ,भाज्या ,धान्य डाळी आपल्या जवळच्या परिसरातून शेतीतून आपल्याकडे येतात त्यांना स्वच्छ धुऊन त्यांचे निर्जंतुकीकरण करणे व ग्राहकांना देणे अत्यंत महत्त्वाचे काम आहे. कोणत्याही पदार्थाच्या सेवनाने मानवी शरीरावर परिणाम होणार नाही म्हणजे अन्न सुरक्षा होय. यासाठी महासंघातर्फे संत गाडगेबाबा स्वच्छता फेरीवाला अभियान द्वारे फेरीवाल्यांना प्रशिक्षण देऊन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी, अन्नसुरक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यातूनच ग्राहकांशी अतूट नाते निर्माण होणार आहे .