सुंदर नसल्याच्या कारणावरून पत्नीचा छळ करणाऱ्या पतीविरोधात चिखलीत गुन्हा दाखल

0
2021

भोसरी, दि. ४ (पीसीबी) – पत्नी सुंदर नसल्याच्या कारणावरून पत्नीचा सतत छळ करून मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. सचिन नरेश कुमार (वय ४३ रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी पतीचे नांव आहे.

याप्रकरणी पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन याचे पहिले लग्न झाले आहे. तरीही याबाबत काहीही माहिती न देता त्यांने पीडित महिलेशी दुसरे लग्न केले. त्यानंतर काही दिवसांनी तुला स्वंयपाक नीट करता येत नाही. तसेच तू सुंदर नाहीस, त्यामुळे माझे मित्र मला चिडवतात, या कारणावरून आरोपी पती  पत्नीला  मारहाण करू लागला.

दरम्यान, त्रास असहाय्य झाल्यानंतर पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिखली पोलीस करत आहे.