जीव देईन, पण तडजोड करणार नाही; ममता बॅनर्जींचा मोदी सरकारला इशारा

0
1308

कोलकता, दि. ४ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ८ फेब्रुवारीपर्यंत धरणे आंदोलन करणार आहेत. जीव देईन पण तडजोड करणार नाही,  असा इशारा त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

टीएमसी नेत्यांना हात लावला तेव्हा मी काहीच बोलले नाही. पण जर कोलकाता पोलीस आयुक्तांच्या खुर्चीला हात लावणार असाल तर मी शांत बसणार नाही’, असे ममता बॅनर्जी यांनी  ठणकावून सांगितले आहे. दरम्यान ममता बॅनर्जी आणि सीबीआय वादावर सर्वोच्च न्यायालयात  मंगळवारी (दि.५) सुनावणी होणार आहे.

शारदा चिटफंडप्रकरणी कोलकात्यात सीबीआय आणि पोलिसांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.   सीबीआयने ममता सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.