सिनेसृष्टीतील आणखी एक तारा निखळला…बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ‘निशीकांत कामत’ काळाच्या पडद्याआड

0
353

हैदराबाद,दि.१७ (पीसीबी) : बॉलीवूडला २०२० हे वर्ष नुकसानकारक ठरत आहे. एकामागून एक धक्के बॉलीवूडला बसत आहे. बॉलिवूडचे मराठी रांगडे दिग्दर्शक निशीकांत कामत यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची तब्येत अतिशय नाजूक होती. अखेर आज वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निशिकांत यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टी हादरली आहे.

निशीकांत कामत यांची अचानक तब्येत बिघडली असल्याने त्यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत.
मागील काही दिवसांपासून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. त्यांना यकृताचा आजार असल्याचं समोर आलं होत. या आजाराला ‘लिव्हर सिरोसिस’ असं म्हणतात. त्यांना यकृताचा त्रास पुन्हा होऊ लागला होता. म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केलं होत.

निशीकांत यांनी अनेक चित्रपटांमधून आपला ठसा मराठी तसेच बॉलीवूड सृष्टीत उमटवला होता. ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यांच्या मराठी ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय.

त्यानंतर, त्यांनी मदारी,दृष्यम, मुंबई मेरी जान, असे अनेक हिंदी चित्रपट करून बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. शिवाय त्यांनी जॉन अब्राहमच्या रॉकी हँडसम चित्रपटात खलनायकाची भूमिका उत्तम सादर केली. परंतु, आज बॉलीवूडने आणखी एक तारा गमावला. निशिकांत यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे.