विनायक मेटे यांचे अपघाती निधन

0
246

– मराठा समाजाच्या आंदोलनांचा बुलंद आवाज हरपला, अवघा महाराष्ट्र हळहळलाय…

पनवेल, दि. १४ (पीसीबी) : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. विनायक मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज… सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा. अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय…

आज मराठा समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी पुण्याहून ते मुंबईला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात जखमी झाल्यानंतर विनायक मेटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही. जवळपास एक तासाहून अधिककाळ त्यांना मदतीसाठी प्रतिक्षा करावी लागली. उपचारांना उशीर झाल्याने त्यांना जीवाला मुकावं लागल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोप केलाय.

भीषण अपघात
विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

हे वय न ज्याण्याचे…
विनायक मेटे यांचं वय अवघं 52 वर्षांचं. त्यामुळे हे वय जाण्याचं नव्हे, अश्या भावना राज्यभरातून व्यक्त होत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे, संभाजीराजे छत्रपती, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, दीपक केसरकर, भास्कर जाधव यांच्यासह अनेक नेत्यांनी मेटे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अजात शत्रू मेटे…
विनायक मेटे हे अजता शत्रू नेते होते. मित्रपक्ष असो की विरोधक… जनतेच्या हितासाठी त्यांनी कायम लढा दिला. पण जेव्हा मैत्रीचा प्रश्न यायचा तेव्हा सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांची खास मैत्री होती. आमचा जवळचा मित्र आम्ही गमावला असल्याचं सर्वच पक्षातील नेत्यांनी म्हटलंय.