राष्ट्रवादीने सगळे काही दिले, निवेदिता मानेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार

0
2384

पुणे, दि. १५ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या हातकणंगले मतदारसंघाच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज (शनिवार)  शिवसेनेत प्रवेश केला.  यावर  राष्ट्रवादीने त्यांना सगळे काही दिले. राष्ट्रीय महिला अध्यक्ष पदही दिले. मात्र, त्यांच्याकडे संयम नाही, अशी प्रतिक्रिया  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली.

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ आज (शनिवार) पार पडला. यावेळी पवार पत्रकारांशी बोलत होते.

निवेदिता माने यांनी खासदारकी लढवायची ठरविले होते. आमची मित्र पक्षांशी बोलणी सुरू होती. त्यामुळे अजून काही ठरलेले नव्हते. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी आमचे उमेदवार असतील, असे गृहीत धरून त्या शिवसेनेकडे गेल्या. त्यांच्याकडे संयम नाही. त्यांना राष्ट्रीय महिला अध्यक्ष पद असे सगळे दिले. तरीदेखील त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हणत असतील, तर त्यात तथ्य नाही, असे अजित पवार म्हणाले.