यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता  – मुख्यमंत्री फडणवीस

0
350

पुणे, दि. १५ (पीसीबी) – राज्यात यंदाच्या वर्षी चालू हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील २६ जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती  आहे. त्यामुळे यंदा साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता  आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) येथे म्हटले आहे.  

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभ आज पार पडला. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील साखर उद्योगासमोर अडचणी असतानादेखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यात आली आहे. तर देशातील महाराष्ट्र राज्य हे सर्व शेतकऱ्यांना एफआरपी देणारे पहिले राज्य ठरले आहे. साखरेचा दर २९ वरुन ३१ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे,  असे त्यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की,साखर उद्योग जिवंत राहिला तर शेतकरीही चांगल्या प्रकारे जगू शकतो. हे लक्षात घेता सरकार शेतकरी वर्गाच्या कायम पाठीशी उभा आहे, असे ते म्हणाले.

सर्वात जास्त पाणी ऊसाला लागते, अशी चर्चा मागील काही वर्षापासून सुरू आहे. यावर आता नवनवीन प्रयोग करणे गरजेच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.  तसेच आमचे सरकार इथेनॉल धोरण तयार करत आहे.  एवढ्या साखरेचा करायच काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.