तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रींग सुरु असल्याचे सांगत आयटी अभियंत्याला घातला 12 लाखांचा ऑनलाईन गंडा

0
65

दि ३० एप्रिल (पीसीबी ) -आयटी अभियंत्याला स्काईपवर अकाउंट उघडण्यास सांगत तुमच्या नावावर मनी लॉन्ड्रींग सुरु असल्याचा बहाणा करून गोपनीय माहिती घेतली. त्याआधारे बँक खात्यातून 12 लाख रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 21 आणि 22 एप्रिल रोजी रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी आयटी अभियंत्याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस फोन करून त्यांना स्काईप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर आयडी बनवण्यास सांगून आरोपींनी त्यांना स्काईपवर जॉईन करून घेतले. त्यानंतर फिर्यादी यांच्या नावावर लखनऊ येथे मनी लॉन्ड्रींग सुरु असल्याचा बहाणा केला. त्यानंतर फिर्यादीकडून आधार कार्ड, डेबिट कार्ड, नेत बँकिंग डीटेल्स घेतले. राष्ट्रीय गोपनीयता कायद्यानुसार फिर्यादीस हा प्रकार कोणालाही सांगता येणार नाही, असेही आरोपींनी सांगितले. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीच्या खात्यातून 12 लाख रुपये ट्रान्सफर करून घेत त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.