दोन महिलांची नग्न धिंड प्रकरणात पोलिसच मुख्य आरोपी

0
65

मणिपूरमध्ये गेल्यावर्षी ३ मे रोजी दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. २० जुलै रोजी व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. तेव्हापासून या प्रकरणाच्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष होतं. याप्रकणात मुख्य आरोपी म्हणून पोलिसांकडे पाहिलं जात असून सीबीआयने केलेल्या चौकशीनंतरच्या आरोपपत्रातही पोलिसांवरच बोट ठेवण्यात आलं आहे. इंडियने एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कुकी झोमी समाजाच्या दोन महिलांची ३ मे रोजी नग्न धिंड काढण्यात आली होती. परंतु, त्याआधी जमावापासून वाचण्यासाठी या महिलांनी पोलिसांची मदत मागितली. या महिला रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलिसांच्या जिप्सीत जाऊन बसल्या. परंतु, चावी नसल्याचं कारण देत पोलिसांनी गाडी चालवली नाही. पोलिसांच्या जिप्सीत आणखी दोन पीडित पुरुषही होते. जमावाने या पीडितांना खेचून गाडीच्या बाहेर काढलं. यावेळी पोलीस मात्र घटनास्थळावरून पळून गेले, असं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलं आहे. सीबीआयच्या तपासात चुरचंदपूर येथे ३ मे रोजी हिंसक घटना घडल्याचे उघड झाले आहे. गुवाहाटी येथील विशेष न्यायालयात सहा जण आणि एका अल्पवयीन मुलाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये आरोपपत्र दाखल केले होते.
इंडियन एक्स्प्रेसने डीजीपी (मणिपूर) राजीव सिंह यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “पोलिस कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाई आधीच करण्यात आली आहे.” तसंच हे प्रकरण सीबीआयकडे असल्याने पोलिसांविरोधात फौजदारी कारवाईबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.

जुलै २०२३ मध्ये व्हायरल झालेल्या आणि देशभरात संतापाचा उद्रेक झालेल्या व्हीडिओनुसार २० आणि ४० वर्षीय महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. काही पुरुष दोन महिलांना ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतानाही व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत होते. त्यानंतर इतर ठिकाणीही अशा अनेक घटना घडल्या. मेईतेई समुदायाच्या जमावाने एका गावात घरे पेटवून हल्ला केला आणि शेजारच्या गावांमधील काही घरांनाही लक्ष्य केले. जमावाने चर्चला जाणीवपूर्वक आग लावली. ४ मे रोजी आजूबाजूच्या मेईतेई गावातील प्रमुख आणि इतर समाजाच्या गावातील प्रमुखांची बैठक झाल्याचेही तपासात समोर आले आहे. परंतु, तरीही जमावाने चर्च, काही घरे आणि जवळपासची गावे जाळली, असं सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

जंगलात पळालेल्या पीडितांना शोधून वेगळं केलं
“तपासात असे समोर आले आहे की भीतीपोटी पीडित जंगलात पळून गेले. परंतु जमावातील काही लोकांनी पीडितांना जंगलात पळताना पाहिलं आणि त्यांनी जमावाला इशारा करून तिथे जाण्यास प्रवृत्त केलं. हातात मोठी कुऱ्हाड घेऊन जमाव त्यांच्या दिशेने धावले आणि ‘तुम्ही चुरचंदपूरमधील लोक आमच्याशी (मेईतेई लोक) ज्या प्रकारे वागलात, आम्हीही तुमच्याशी तेच करू’, अशी धमकी दिली. जमावाने पीडितांना बळजबरीने मुख्य रस्त्यावर आणले आणि त्यांना वेगळे केले. पीडितांपैकी एकाला आणि तिच्या नातवाला एका दिशेला; दोन महिला, त्यांचे वडील आणि त्यांच्या गावप्रमुखाला दुसऱ्या दिशेला; तर दोन महिला आणि दोन पुरुषांना तिसऱ्याच दिशेला पाठवण्यात आलं”, असं सीबीआयने आरोपपत्रात म्हटलंय.
सीबीआयच्या आरोपपत्रात असे नमूद केले आहे की जमावातील काही लोकांनी पीडितांना गावाच्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलीस जिप्सीजवळ जाण्यास सांगितले. “पोलीस जिप्सीजवळ येत असताना, जमावाने पुन्हा पीडितांना वेगळे केले…दोन पीडित महिला पोलीस जिप्सीमध्ये जाण्यात यशस्वी ठरल्या. गाडीमध्ये साधा खाकी गणवेश घातलेल्या ड्रायव्हरसह दोन पोलीस होते आणि तीन ते चार पोलीस गाडीबाहेर होते. एका पीडित पुरुषाने पोलिसांना वाहन सुरू करण्याची विनंती केली, मात्र पोलीस जिप्सीच्या चालकाने ‘चावी नाही’ असे उत्तर दिले. त्यांना मदत करण्यासाठी आणि जमावाकडून मारहाण होत असलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ते वारंवार पोलिसांकडे याचना करत राहिले, पण पोलिसांनी त्यांना मदत केली नाही, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.

पीडितांना जमावाकडे सोपवून पोलीस पळाले
जिप्सीच्या चालकाने अचानक गाडी चालवली आणि सुमारे १००० लोकांच्या हिंसक जमावाजवळ गाडी थांबवली. पण पीडित पुरुषाने पुन्हा पोलिसांना वाहन सुरू करण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी त्याला गप्प बसण्यास सांगितले. सीबीआयच्या तपासात समोर आले की, मोठा जमाव पोलीस जिप्सीच्या दिशेने आला आणि त्यांनी वाहनावर हल्ला केला. त्यांनी जिप्सीमधून एक पुरुष आणि दोन महिला पीडितांना बाहेर काढले. दरम्यान, पीडितांना जमावासोबत एकटे सोडून पोलीस घटनास्थळावरून निघून गेले. त्यांनी दोन्ही पीडित महिलांचे कपडे फाडले आणि एका पुरूष पीडितेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पीडित महिलांपैकी एक जवळच्या घटनास्थळी उपस्थित होती आणि तिने संपूर्ण घटना पाहिली, असं सीबीआयने सांगितले.
मणिपूर सरकारची विनंती आणि केंद्राच्या सूचनेनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्यात सामूहिक बलात्कार, खून, महिलेचा विनयभंग