राजर्षी शाहू कॉलेज आणि आयटूआयटीचे जांबवडे गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात

0
568

पुणे, दि. १७ (पीसीबी) – राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि आयटूआयटीच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील जांबवडे येथे ३० डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती व स्त्री-शिक्षण रॅली, पॉवर ऑफ यूथ आणि सेंद्रिय शेती यावर मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचे विविध खेळ तसेच शुद्धलेखन, चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस वाटप केले. जलसंवर्धन या संकल्पनेनुसार गावाशेजारी डोंगराळ भागात अनेक बंधारे बांधण्यात आले. गावातील महिलांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेतून गावाविषयी विविध माहिती देणाऱ्या अॅप्लिकेशनचे काम सुरू केले.

या शिबीरासाठी जांबवडे गावच्या सरपंच सारिका गोजगे, उपसरपंच अंकुश गोजगे, सभापती मंगला वाळुंज, सागर नाटक, अभिजित नाटक, कार्यक्रम अधिकारी विक्रम देशमुख, डॉ. संदीप वर्पे यांनी सहकार्य केले. विद्यार्थी प्रतिनिधी अजय शेलार, विक्रांत देशमुख, शुभांगी इंगळे, अक्षय फुलसौंदर, मंगेश शिंदे, जिज्ञेश पाटील, आशुतोष शिंदे यांनी शिबीर यशस्वीपणे पार पाडले. राजर्षी शाहू कॉलेजच्या प्राचार्य डॉ आर. के. जैन, उपप्राचार्य देवस्थळी, आयटूआयटी हिंजवडीच्या प्राचार्य डॉ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले.