दिघीत १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या

0
800

दिघी, दि. १७ (पीसीबी) – राहत्या घरातील छताला साडीच्या सहायाने गळफास घेऊन एका १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.१६) सायंकाळच्या सुमारास दिघीतील स्वराज कॉलनी येथे घडली.

विकी मदन सिंग (वय १९, रा. स्वराज कॉलनी, गजानन महाराजनगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास विकी याने दिघीतील त्याच्या राहत्या घरात साडीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केली. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विकी याने आत्महत्या का केली हे अद्याप समजु शकले नाही. मात्र तो आळंदी येथील एमआयटी कॉलेजचा हुशार विद्यार्थी होता असे समजते. दिघी पोलीस तपास करत आहेत.